
कोल्हापूर : पत्रकार आणि माहिती खाते हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही माहिती अधिकारी म्हणून काम करत असताना पत्रकार म्हणून देखील काम करत असतो. त्यामुळे या दोन्हीमध्ये फार काही फरक नाही असे मत जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी व्यक्त केले. एस. आर. माने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापुरात काम करण्याची माझी इच्छा होती. ती पूर्ण झाली असून मी कोल्हापुरातून निवृत्त होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. जरी मी निवृत्त झालो तरी सर्व प्रसारमाध्यमांचा सल्लागार म्हणून नेहमीच कार्यरत राहीन अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, दैनिक क्रांतिसिंह च्या संपादिका सुनंदा मोरे,ज्येष्ठ पत्रकार उदय कूळ, सत्यवादी चे प्रतिनिधी एम.वाय.बारस्कर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना माने यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. आभार कोल्हापूर प्रेस क्लबचे सचिव बाळासाहेब पाटील यांनी मानले. यावेळी प्रसार माध्यमातील सर्व प्रथम पत्रकार, छायाचित्रकार व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
Leave a Reply