
कोल्हापूर:भारतातील सर्वांत मोठ्या हवाई वाहतूक कंपनी इंडिगोने आपली सेवा देण्याचे६९वेठिकाण म्हणून कोल्हापूरचेनाव जाहीर केले आहे.आपल्या १३व्या एटीआर विमानाच्या सहाय्याने इंडिगो दररोज कोल्हापूर ते हैदराबाद आणि कोल्हापूर ते तिरुपती या मार्गांवर विनाथांबा उड्डाणांची सेवा उपलब्ध करून देणार आहे, ज्याची सुरुवात १२ मे २०१९ला होणार आहे.त्याचबरोबर रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत (आरसीएस) अलाहाबाद, हुबळी आणि जोरहाट यांना जोडल्यानंतर इंडिगोच्या वतीने कोल्हापूर हा आरसीएसमधला ४था मार्ग असेल.कायम नव्या आणि परवडणाऱ्या विमान उड्डाणांच्या शोधात असलेल्या फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसोबतच व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी नवी उड्डाणे ठेवण्यात आली आहेत. या नव्या उड्डाणांमुळे विमान कंपनीच्या एटीआर ऑपरेशनला बळ मिळणार आहे. जे प्रवासी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करू इच्छितात त्यांनाwww.goindigo.inवेबसाइटवरून तिकिटे आरक्षित करता येतील.
इंडिगोचे मुख्य कमर्शियल अधिकारी विल्यम बोल्टर म्हणाले, ”कोल्हापुरातून विमानाने उड्डाण करण्याची संधी आम्ही मे २०१९पासून उपलब्ध करून देत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. कोल्हापूर ही आमच्या दृष्टीने महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत (आरसीएस) अलाहाबाद, हुबळी आणि जोरहाट नंतर कोल्हापूर हा चौथा मार्ग आहे. आम्ही आमचे जाळे मजबूत करत आहोत आणि आणखी परवडणारी सेवा, आमच्या ग्राहकांसाठी पॉइंट-टू-पॉइंट कनेक्टिव्हिटी देऊ शकू, असा आमचा विश्वास आहे. इंडिगो वेळेत, विनयशील तसेच अडथळेविरहित सेवा आणि परवडणारा विमान प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहील.”
Leave a Reply