जेएसडब्ल्यू समूहाचे ‘जेएसडब्ल्यू पेंट्सद्वारे’ रंगांच्या व्यवसायात पदार्पण

 

बंगळुरू:‘जेएसडब्ल्यू समूह’ या भारतातील आघाडीचा उद्योगसमूहाने जेएसडब्ल्यू पेंट्स या ब्रँड खाली रंग(पेंट्स) व्यवसायात प्रवेश केला आहे. ग्राहकांशीथेट संपर्क होणाऱ्या विविध व्यवसायातउतरण्याच्या समूहाच्या विचारधारेचाच हा एक भागआहे. तसेच या प्रवेशाने इतिहासातपहिल्यांदाच भारतीय उद्योग समूह संघटित अशारंग व्यवसायात उतरला आहे. रंग व्यवसायातदाखल होऊन, ग्राहकांच्या घरासाठी लोखंड, सिमेंट, फर्निचर आणि आता पेंट अशा व्यापक सेवाउपलब्ध करण्याचा जेएसडब्ल्यू समूहाचा उद्धेशआहे. या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्यातुलनेत, जेएसडब्ल्यू पेंट्स हा अत्याधुनिक तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि स्केल याआधारे एक ग्रीनफील्डउपक्रम आहे. इंडस्ट्रियल कोटिंग्ज तसेचडेकोरेटिव्ह पेंट्स अशा दोन्हीचे उत्पादन आणिविक्री कंपनी करणार आहे. औद्योगिककोटिंगमध्ये जेएसडब्ल्यू पेंट्सने क्वाईल कोटिंगच्यामाध्यमातून कामकाज सुरु केले आहे. तरडेकोरेटिव्ह पेंट्स विभागात कंपनीने, घराच्या आतील आणि बाहेरच्या भिंतींसाठी फक्तपाण्यावर आधारित रंगांची संपूर्ण  श्रेणी उपलब्धहोईल. तसेच घरासाठी लाकडी आणि धातूचेविविध पृष्ठभाग (various surfaces ) उपल्बधअसतील. या उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार, सन२०२२ पर्यंत भारतीय संघटित रंग उद्योग  हा १५ % सीएजीआरसहित सुमारे ५०,००० कोटींच्या पुढेजाईल, अशी अपेक्षा आहे. वेगाने वाढणारी ग्राहकगतिशीलता, व्यवसायातील रितेपणाची गरज तसेचजागतिक ट्रेंड्स समजून घेण्यासाठी जेएसडब्ल्यूपेंट्सने अगदी सक्रियपणे बाजाराचा अभ्यास केलाआहे. भारतीय रंग क्षेत्रात एक प्रमुख कंपनीहोण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. जेएसडब्ल्यू पेंट्सच्या अनावरणप्रसंगी बोलताना, जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जी जिंदाल यांनी सांगितले कि, “जेएसडब्ल्यू पेंट्सचा प्रत्येक पैलू हा यापूर्वी कधीही झाली नाही अशाप्रकारे दर्जेदार असल्याची आम्ही खात्री केली आहे. तसेच आमच्या ग्राहकांना खरे मूल्ये देण्याची वचनबद्धता आहे. म्हणूनच भारतात पहिल्यांदाच एकाच किंमतीत कोणताही रंग उत्पादनामध्ये देण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल आम्ही विचारपूर्वक उचलले आहे. जेएसडब्ल्यू पेंट्स हेच भारतीय घरांचे भविष्य आणि रंगकाम असावे असे आमचे उद्धिष्ट आहे.”जेएसडब्ल्यू पेंट्सचे सह व्यवस्थापकीयसंचालक  मुख्य कार्यकारी अधिकारी  एससुंदरेसननी सांगितले कि,आमच्या ‘एनीकलर वन प्राईस’ या योजनेमुळे ग्राहकांना मोठेमूल्य, किमंत पारदर्शीपणाला सुरुवात झाली असूनत्यांच्या घरांसाठी आत्मविश्वासाने रंगांची निवड करण्यास ते मुक्त झाले आहेत.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!