घुणकीत ग्रामपंचायतीच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी 

 
घुणकी : येथे दरवर्षीप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले. त्यानंतर सामूहिकरित्या वंदन करण्यात आले . यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मदन डाळे, उपसरपंच प्रल्हाद पाटील, ग्राम सदस्य अशोक जाधव, तानाजी जाधव, तुकाराम कोळेकर, उमेश पाटोळे, अविनाश मगदूम, पोलीस पाटील संदीप तेलीही उपस्थतीत होते.         
तसेच  विविध मंडळाच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, शिवशक्ती तरुण मंडळ, भगतसिंग तरुण मंडळ, शिवनेरी चौक, शिवप्रेमी चौकमधील शिवभक्तांनी आपआपल्या ठिकाणी मंडप उभे करून अगदी शांततेतने शिवजयंती साजरी केली. 
यामध्ये शिवप्रेमी ग्रुपमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मंडळाचे सदस्य बजीरंग पाटील व शिवाजी चिबडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामूहिकरित्या ”जय शिवाजी” जय भवानी” यांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी तरुण मुलांची संख्याही लक्षणीय होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, माणिक पाटील, सुशांत पाटील, रघुनाथ पाटील, शिवाजी पाटील, सुकुमार पाटील, कृष्णात पाटील, भूषण पाटील, भगवान जाधव, उज्जवल मोहिते, उपसरपंच प्रल्हाद पाटील, पोलीस पाटील संदीप तेलीही उपस्थतीत होते.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!