
घुणकी(सचिन कांबळे): येथील राधा कृष्ण मंदिरामध्ये युवा क्रांती आघाडी यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे तलाठी प्रशांत काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर सामूहिकरित्या वंदन करण्यात आले . यावेळी माजी उपसरपंच अशोक जाधव म्हणाले की, आज संभाजी महाराज यांच्याबद्दल काही लोक चुकीचा इतिहास पसरविण्याचा प्रयत्न करून तरुणांची माथी भडकविण्याचा प्रयत्त्न करताना दिसत आहेत. मात्र आज स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या मालिकेतून खरा इतिहास मराठा समाजाला समजत आहे . येथून पुढे बहुजन समाजाने एकदिलाने एकसंघ राहून समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी राहिली याकडे लक्ष दिले पाहिजे. यावेळी युवा क्रांती आघाडीचे अध्यक्ष शहाजी सिद, माजी उपसरपंच मारुती पाटील यांनी आपले मनोगते व्यक्त केली. त्यानंतर सामूहिकरित्या ”जय शिवाजी” जय भवानी” यांच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच विविध मंडळाच्यावतीने संभाजी महाराज यांची जयंती उत्सवाने साजरी करण्यात आली. यामध्ये, शिवशक्ती तरुण मंडळ, भगतसिंग तरुण मंडळ, शिवनेरी चौक, शिवप्रेमी चौकमधील शिवभक्तांनी आपआपल्या ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून अगदी शांततेतने संभाजी महाराज जयंती साजरी केली. यावेळी तरुण मुलांची संख्याही लक्षणीय होती.
यावेळी उपसरपंच प्रल्हाद पाटील, ग्राम सदस्य अशोक जाधव, प्रभाकर कुरणे , तानाजी जाधव, संजय बुड्ढे, तुकाराम कोळेकर, नामदेव पाटील , रमेश पाटील , अविनाश मगदूम, जयसिंग कुरणे , विकास जाधव , माजी पोलीस पाटील आनंदा पाटील, पोलीस पाटील संदीप तेली जयसिंग कुरणे, उमेश गुरव, संजय गुरव , बाजीराव पाटील , जालिंदर जाधव ,जयवंत जाधव, आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थतीत होते.
Leave a Reply