घुणकीत तथागत बौद्ध जयंती साजरी 

 
घुणकी (सचिन कांबळे): येथे तथागत गौतम बुद्ध यांची २५६३ वी जयंती सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपसरपंच प्रल्हाद पाटील व माजी उपसरपंच जालिंदर नांगरे, आर टी आय प्रतिनिधी (मुंबई) नितीन हराळे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी स्टार प्रवाहावरील ”डॉ बाबासाहेब आंबेडकर” महामानवाची गौरव गाथा या सिरियलचा पहिला शो बौद्ध वसाहतीत दाखविण्यात आला. यावेळी महिलांची उपस्थितीत लक्षणीय होती. लहान मुलांचाही सहभाग यावेळी दिसून आला. या सिरीयलमधून समाज जागृती करण्याचा मानस सिद्धार्थ तरुण मंडळाचा दिसून आला. यावेळी उपसरपंच प्रल्हाद पाटील व माजी उपसरपंच जालिंदर नांगरे, आर टी आय प्रतिनिधी (मुंबई) नितीन हराळे, क्राईम डायरी प्रतिनिधी जितेंद्र कांबळे, अभिजीत कांबळे (सर), पत्रकारभूषण सचिन कांबळे, आर टी आय प्रतिनिधी(घुणकी), महावीर कांबळे, राजू शिंदे, अनिल पाटोळे, दिलीप कांबळे विकास कांबळे . गौतम कांबळे , अरुण कांबळे, स्वप्नील कांबळे ,किरण सनदी, अशोक कांबळे, सुभाष माने, धनपाल पेठारे, आकाश कांबळे, दिनकर कांबळे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!