
कोल्हापूर: कोल्हापूरात धर्मवीर संभाजीराजे स्मारक प्रेमी आणि सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त पापाची तिकीट येथेछत्रपती संभाजी महाराज यांच्या वडबुद्रुक (तुळापूर, जि.पुणे) येथील समाधीस्थळावरील पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विधीपूर्वकपादुकांस अभिषेक घालण्यात आला व पादुकांचे पूजन आमदार राजेश क्षीरसागर नगरसेवक ईश्वर परमार, ज.शिवानंद बनसोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले .दरम्यान उपस्थितांना सरबत वाटप करण्यात आला.तर स्मारकाची रंगरंगोटी, फुलांचीआरास व विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. यावेळी चित्तथरारक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली व सायंकाळी सदर ठिकाणी दिपोत्सव साजरा करण्यात आला.या पादुका शिल्पकार संदीप पाटील यांनी तर या कार्यक्रमाचे पौराहित्य रायगडावरील पुजारी दादामहाराज राशिवडेकर यांनी केले.कार्यक्रमास स्मारक समितीचे अध्यक्ष श्रीराम जाधव, सहयाद्री शिलेदारचेअध्यक्ष अभिजीत सूर्यवंशी, विशाल शिंदे, विनायक शिंदे, फिरोज सत्तारमेकर,वैभव भोसले, मोहन माजगांवकर, देवेंद्र भोसले, आशुतोष सूर्यवंशी, आशपाक बागवान आणि शिवप्रेमी व शंभूप्रेमी उपस्थित होते.
Leave a Reply