
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कै. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील कै. सदाशिवराव मंडलिक यांना मी माझा विजय समर्पित करत आहे. जनतेनेही निवडणूक हातात घेतली होती. मला इतक्या मताधिक्क्याने निवडून देण्यात समस्त कोल्हापूर जनतेचा हात आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे निवडून आलेले खास संजय मंडलीक यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले असून त्यामुळे कोल्हापूरचा स्वाभिमान जागा झाला आहे असे म्हणता येईल असे त्यांनी सांगितले आहे.
माझे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच मित्र पक्ष यांनी शिवसेनेशी बांधील राहून ही निवडणूक लढवली आणि त्यात माझा विजय झाला आहे अशीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरच्या कोणत्याही प्रश्नासाठी जनतेला आंदोलन करावे लागत आहे. परंतु आता आंदोलन न करता सर्व प्रलंबित योजना पूर्ण करेन तसेच कोल्हापूरच्या विकासाला प्राधान्य देणार आहे. यामध्ये खंडपीठाचा समावेश असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले.
माझ्या यशात सर्व संघटनांचे कार्यकर्ते यांचा समावेश आहे असे सांगून नूतन खासदार संजय मंडलिक यांनी त्यामुळेच मी आणि विजयी झालो असून युतीच्या आमदारही पुढील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात निवडून येतील असेही त्याने सांगितले .शिवाजी पूल व अनेक नवीन प्रकल्प यांचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले आहे असे सांगून कोल्हापूरचा स्वाभिमान जागा झाला असल्याने मी निवडून आलो असल्याचे त्यांनी सांगितले .
आ. सतेज पाटील यांनी आमचे ठरले ही उघडपणे भूमिका घेतली होती त्यामुळे माझ्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे माझे मित्र आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी त्यांना सर्वतोपरी प्रयत्न मदत करणार असल्याचे सांगून सबका साथ सबका विकास हे ध्येय समोर ठेवून मी माझी वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले व गोकुळचे मल्टीस्टेट होणे हे जनतेला मान्य नव्हते त्यामुळे त्याला विरोध झाला असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
यावेळी बोलताना आम.चंद्रदीप नरके यांनी युतीची सत्ता आली आहे आम्ही सर्व जण शिवसेनेचे कार्यकर्ते व आम मिळून जोरदार प्रचार केला होता दोन्हीही ठिकाणी आमचे खासदार निवडून आले आहेत आम्हाला डबल लॉटरी लागली असल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम प्रगतीच्या दिशेने कसा जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगून ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती यामध्ये जशक्तीचा विजय झाला आहे असे सांगितले.
या निकालामुळे युतिला चांगले बळ मिळाले असून याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे असे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
शिवाय यावेळी बोलताना आम.राजेश क्षीरसागर यांनी यांनी निकालाबाबत आपली प्रतिक्रिया दिली नूतन खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मी आटोकाट प्रयत्न केले परंतु कोणीतरी काहीतरी अडाणीपण आणि बोलते आणि गैरसमजुतीने गोष्टी निर्माण होतात परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांनी नेहमीच आमच्या पाठीशी राहिले आहेत अशी भूमिका आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केली तसेच केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे युती असल्याने येत्या विधानसभेत नूतन खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार निवडणूक एकजुटीने लढवू असे क्षीरसागर यांनी सांगितले.
Leave a Reply