
कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना धक्का बसणार असे स्पष्ट संकेत होते. आणि पहिल्या फेरीपासून शिवसेनेच्या प्रा. मंडलिक यांनी मोठे आघाडी घेतली तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना पिछाडीवर टाकले. विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्यावर संजय मंडलिक यांनी तेराव्या फेरीअखेर एक लाख 96 हजार मतांनी निर्णायक आघाडी घेतली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम रमणमळा येथे तर हातकणांगले मतदारसंघाची मतमोजणी शासकीय गोदाम सरनोबतवाडी येथे सकाळी 8 पासून सुरू झाली. केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य पोलीस दल, राज्य राखीव दल, केंद्रीय पोलीस दल अशी तिहेरी व्यवस्था मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर पर्यंत ठेवली होती.
संजय मंडलिक व धनंजय महाडिक यांच्यात अटीतटीची लढत होती. मात्र पहिल्या फेरीपासून संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांच्यावर मोठ्या आघाडी घेतली.
त्यांनी पहिल्या फेरीतच 19683 मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत आघाडी 34624 मतांनी मात केली. तिसऱ्या फेरीत 52135 मतांनी तर चौथ्या फेरीत शिवसेना उमेदवारांचे मताधिक्य वाढत राहिले. चौथ्या फेरीत मंडलिकांना 66981 मतांची आघाडी मिळाली पाचव्या फेरीत 83930 मतांची आघाडी मिळाली.
सहाव्या फेरीत मंडलिकांना 99 हजार 996 तर सातव्या फेरीत 1 लाख13 हजार 616 तर आठव्या फेरीत 1 लाख 22 हजार 842 मतांची आघाडी मिळाली.नवव्या फेरी अखेर प्रा,संजय मंडलिकाची भक्कम 1,38,271 मतांची विजयी आघाडी,10 व्या फेरीत 1 लाख 60 हजार 881,अकराव्या फेरीअखेर 1 लाख 76 हजार 677,बारावी फेरीत 1 लाख 92 हजार 738, तेराव्या फेरीअखेर 2 लाख 7 हजार 948, चौदाव्या फेरीत 2 लाख 22 हजार 438, पंधराव्या फेरी अखेर प्रा.संजय मंडलिक 2,43,746 मतानी तर सोळाव्या फेरी अखेर मंडलिक 2 लाख 43 हजार 746 ने आघाडीवर,सतराव्या
फेरी अखेर भाजपा शिवसेना रासप महायुती ऊमेदवार प्रा.संजय सदाशिवराव मंडलिक हे 2 लाख 55 हजार 995 मतानी आघाडीवर आहेत.अजूनही मतमोजणी सुरू असून 5 फेऱ्यांचे निकाल बाकी आहे.
राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्यावर गेल्या वेळी झालेल्या पराभवाचा वचपा यावेळी काढणार हे येथे स्पष्ट झाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ही सहा विद्यमान सभा मतदार संघात मंडलिक यांनी निकटचे प्रतिस्पर्धी धनंजय महाडिक यांच्यावर आघाडी घेतली.
Leave a Reply