
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने दिलेला कौल, मी स्वीकारत असून, निवडणूकीचा निकाल अनपेक्षित असला तरी मला मान्य आहे. गेल्या ५ वर्षात खासदार म्हणून मी कोल्हापूरच्या विकासासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न केले. अनेक विकासकामे पूर्णत्वास आली तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. येत्या वर्षभरात अनेक कामे प्रत्यक्ष उभारतील, अशी आशा आहे. या निवडणुकीचा निकाल स्वीकारून, मी पुन्हा उद्यापासून जनतेच्या सेवेसाठी यथाशक्ती काम करण्यास तयार आहे. माझ्यावर विश्वास ठेवून , ज्या मतदारांनी मला मतदान केले, माझ्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली, त्या सर्व नागरिक, कार्यकर्ते, नेते आणि महिला भगिनींचा मी आभारी आहे.
Leave a Reply