
कोल्हापूर: खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयात शिवसेना, भाजप महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत कॉंग्रेस – राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट हे या विजयाचे फळ आहे. कोल्हापूरची स्वाभिमानी जनताच या विजयाची शिल्पकार असून, आई अंबाबाईच्या करवीरनगरीतील शिवसेनेचा खासदार व्हावा, हि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. हा विजय खऱ्या अर्थाने कोल्हापूर वासियांकडून शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहणारा आहे. हि स्वप्नपूर्ती होताना शिवसेनाप्रमुख आपल्यात हवे होते, हि खंत मनाला वाटते. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिवसेनेचे झाल्याने संपूर्ण जिल्हा शिवसेनामय झाला असून, शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना – भाजप महायुतीचे दहा आमदार निवडून आणू आणि पुन्हा महाराष्ट्रात युतीचे सरकार आणू, असा ठाम विश्वास आहे. आजच्या विजयाबद्दल नूतन खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह विजयासाठी अहोरात्र कष्ट केलेल्या सर्वांचे अभिनंदन.. यासह विजयासाठी कष्ट घेतलेल्या सर्वांचे मतदार बंधू भगिनींचे हार्दिक आभार.
Leave a Reply