ओशो धारा मैत्री संघाच्यावतीने सहा दिवशीय निवासी शिबिराचे पन्हाळगडावर आयोजन

 

कोल्हापूर : वाढत्या मानसिक ताणतणावाच्या पलिकडे जाऊन निरतंर निखळ आनंदाची अनुभूती देत जीवनाचा ध्यानसमाधीकडे प्रवास सुरु करणाऱ्या ” ओशो मय जीवन धारा आणि ध्यान समाधीचा अनुभव देणारे शिबिर येत्या ३१ मे ते ५ जून अखेर आयोजित करण्यात आले आहे. ऐतिहासिक पन्हाळगडावर ” नरके डिफेन्स अकँडमी मघ्ये हे शिबीर संपन्न होणार आहे. या शिबीरात पहिला टप्पा जगातील अंतिम सत्याची अनुभूती देणारा ओमकार जप तसेच ध्यान समाधी मघून विश्वात्मकतेची झलक दाखवणारा दुसरा टप्पा भल्या पहाटे पासून रात्री पर्येत च्या विविध सत्रातून शिकवला जाणार आहे. अश्या विविध २८ टप्प्यातून असिम आणि शाश्वत आनंदाची प्रचिती प्रत्येकाला नक्कीच घेता येते.या शिबिराचे मुख्य संचलन चेन्नई चे ओशो स्वामी ध्यानयोगीजी हे करणार असून त्यास नागपूरचे स्वामी प्रेम अनमोल सह कोल्हापूर च्या साधक बी.एम.शांभवी तथा ओशो तेजस्वीनी आणि लता बोरा तथा ओशो संगिता या सहयोगी म्हणून मदत करणार आहेत. यात सहभागी अभ्यासक शिबीरार्थीना सात्विक आहारासह निसर्गरम्य वातावरणाची सहा दिवस ओशो टीम सह अनुभुती घेता येणार आहे तसेच त्यांना पुढील सराव अभ्यासासाठी संदर्भ पुस्तक संच ही देण्यात येणार आहे.यात सहभागी होण्यासह आघिक माहिती साठी , समन्वयिका नीलम मोरे 7972750672 यांचेसह सिघ्दीविनायक अपार्टमेंट,अपना बँकेसमोर ,ताराबाई पार्क येथे संपर्क साधावा , असे आवाहन स्थानिक संयोजक ओशो घारा मैत्री संघ,कोल्हापूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!