

कोल्हापूरमध्ये या ग्रुपचे कामकाज पाहण्याची जबाबदारी सचिन तानाजी सावेकर हे सांभाळत आहेत या ग्रुपच्या वतीने अनाथ आश्रम बालसंकुल येथे जीवनावश्यक धान्य स्वरूपात मदत देऊन ग्रुपचे काम सुरू करण्यात आले.ही मदत संकुल येथील अधिक्षिका अश्विनी गुजर यांच्याकडे देण्यात आली.
यावेळी बोलताना सचिन सावेकर यांनी तानाजी जाधव यांचा हा टायगर ग्रुप वेगळ्या पद्धतीचे सामाजिक कार्य करतो कोल्हापूरमध्येही ग्रुपच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत यासाठी हा ग्रुप कार्यरत झाला असून याची सुरुवात बालसंकुल येथे धान्य स्वरूपात मदत देऊन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी बोलताना संगीता राणे यांनी जाधव यांचे कार्य खूप मोठे आहे सोशल मीडियावर त्यांच्या कार्याची मी खूप माहिती पाहिली आहे व ऐकली आहे त्यामुळेच मी या ग्रुपमध्ये येण्याचे नियोजन केले आणि मी सचिन शी संपर्क साधून या ग्रुप मध्ये आले यापुढेही मी या ग्रुपच्या माध्यमातून चांगले काम करणार असल्याचे सांगितले .
यावेळी बालसंकुलच्या कांचन हेब्बाळकर, पी.के.डवरी, संचालिका पद्मजा तिवले ,द्रौपदी पाटील, पद्मजा गारे, स्मिता वायचळ,तुकाराम कदम ,शरयू मोरे ,संध्या तळेकर, अश्विनी आवळे आदी उपस्थित होते. शिवाय टायगर ग्रुप च्या वतीने अमित पवार, जगदीश पाडळकर, अभिजीत तीवले ,आनंद देवकुळे, भाऊ कदम, अजित यादव, सतीश वाडकर, अजित वाडकर ,विनायक महाडिक ,प्रीतम पाटील गणेश यादव आदी उपस्थित होते.
Leave a Reply