घुणकीत युवा क्रांती आघाडीची इफ्तार पार्टी रंगली  

 
घुणकी :(सचिन कांबळे)  येथे युवा क्रांती आघाडी यांच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता इफ्तार पार्टी रंगली. युवा क्रांती आघाडीतर्फे पहिल्यांदाच आयोजित इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थितीत लावली. यावेळी समाजात सुख, समाधान आणि शांतता नांदावी, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी या इफ्तार पार्टीला माजी सामाजिक न्यायमंत्री जयवंतराव आवळे, आमदार डॉ सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आंवळे, यांनी सर्व मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देत युवा क्रांती आघाडीच्या माद्यमातून केलेल्या इफ्तार पार्टीच्या  नियोजनाचे कौतुक केले,  यावेळी युवा क्रांती आघाडीचे शहाजी सिद यांनीदेखील उपस्थितीत मुस्लिम बांधवाना या इफ्तार पार्टी आयोजनाची महत्व सांगून सर्व मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या, व यापुढे आमच्या आघाडीच्या माद्यमातून सर्व समाज एकसंघ कसा राहील व गावामध्ये प्रत्येक समाजात सुख, समाधान, समृध्दी आणि शांतता कशी राखता येईल यासाठी एकदिलाने आमचे प्रयत्न राहतील याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच यावेळी मल्हार सेनेचे सर सेनापती बबन राणगे यांनी देखील सर्व मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देत, आपण सर्व असेच एकत्रित राहून गावाला एक नवा आदर्श घालून दिलात त्याचा आनंद नक्कीच मोठा आहे.  

यावेळी ग्राम सदस्य तानाजी जाधव, माजी उपसरपंच मारुती पाटील, माजी उपसरपंच भानुदास सिद, माजी उपसरपंच जयसिंग कुरणे,  मल्हार सेनेचे अण्णा सिद, सकाळचे संजय पाटील (वार्ताहर), स्पीड न्यूजचे पत्रकार व पत्रकारभूषण सचिन कांबळे, जेष्ठ नागरिक हिंदुराव पाटील, संजय नांगरे, बाजीराव पाटील, विकास जाधव, अरुण नांगरे, सतीश मोरे, हणमंत मोहिते, पोपट मोहिते, अरुण सिद, प्रा रघुनाथ सिद, विठ्ठल जगताप, आकाराम पाटील, संजय जाधव, जालिंदर जाधव, अविनाश जाधव, सुनील जाधव, माजी ग्राम सदस्य अमोल जाधव, जयवंत जाधव, यांच्यासह पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, गावचे तलाठी प्रशांत काळे, कोतवाल लक्ष्मण पवार, शिवाजी खताळ, मुकुंद पाटील, पोलीस पाटील संदीप तेली, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आप्पासो मोहिते आदी  सहभागी झाले. 
युवा क्रांती आघाडीचे शहाजी सिद, संजय बुढे, रमेश पाटोळे, रमेश पाटील, नामदेव पाटील, संजय गुरव, शिशिकांत जाधव, आदी गावातील विविध पतसंस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते, यावेळी या इफ्तार पार्टीचे स्वागत रमेश पाटील व आभार संजय गुरव यांनी मानले  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!