दोन जून रोजी किल्ले पारगड प्रदक्षिणा आयोजित

 

कोल्हापूर : शिवसेना कोल्हापूर जिल्हा आयोजित सहकारी संस्था हिल रायडर्स फाउंडेशन, समिट एडवेंचर ,संवेदना सोशल फाउंडेशन, किल्ले पारगड जनकल्याण संस्था यांच्या सहकार्याने दिनांक 2 जून 2019 रोजी किल्ले पारगड प्रदक्षिणा 2019 तालुका चंदगड आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती प्रमोद पाटील, विजय देवणे ,राहुल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वराज्याच्या पार दक्षिण टोकाला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत आणि नयनरम्य निसर्गाचे देणे असलेला हा पारगड किल्ला सुमारे 48 एकरात पसरलेला हा किल्ला आहे पूर्व-पश्चिम आणि उत्तरेला असलेल्या ताशीव कडे यांच्या तटबंदीमुळे हा किल्ला बांधला आहे दक्षिणेला उतार आणि खोल दरी या रचनेमुळे आवश्यक तेथे तटबंदी बांधली आहे पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी साधारण1676 च्या आसपास शिवरायांनी या गडाची निर्मिती केली आणि पहिला किल्लेदार नेमले नरवीर तानाजी मालुसरे यांना त्यांची समाधी आजही किल्ल्यावर आहे शिवरायांनी हा किल्ला बांधून पुर्ण केला गडावर प्रवेश केला आणि इथल्या मावळ्यांना आज्ञा केली चंद्रसूर्य आहेत तोवर गड जागता ठेवा या प्रेरणेमुळेच काय कुणास ठाऊक पण नंतर तब्बल 176 वर्ष हा अजिंक्य गड होता .
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाचा साक्षीदार असणारा अतिदुर्गम कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर स्वराज्याचे रक्षण करीत ताठ मानेने हा किल्ला उभा आहे स्वराज्य निर्मितीत सहभागी असणारा महाराष्ट्रातील किल्ले पारगड त्यांच्या तर खालून प्रदक्षिणा घालण्याची संधी एक जून रोजी होणाऱ्या जागतिक दुर्गदिन आणि सहा जून रोजी असणारा छत्रपती शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य सा धून दिनांक दोन जून रोजी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे .
निसर्गरम्य ऐतिहासिक पार्श्वभूमी जंगली जनावरांचा वावर अनेक वनौषधी विविध पक्षी त्याचबरोबर छत्रपतींच्या आदेशाने म्हणजे सूर्य चंद्र असेपर्यंत गड सोडू नये म्हणून केलेली आज्ञा शिरसावंद्य मानून गडाचे रक्षण करणारे गडकर यांच्या वंशजांची हितगुज करून गडावरील भवानी मातेचा आशीर्वाद घ्यावा प्रथम सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!