
कोल्हापूर: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा म्हणजेच एच एससी बोर्ड, बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही विभाग मिळून कोल्हापूर एक विभाग असतो. या विभागामध्ये सातारा, सांगलीपेक्षा कोल्हापूर जिल्हा निकालांमध्ये प्रथम असल्याचे निदर्शनास येते. सातारा 86.26%, सांगली 86. 55 टक्के तर कोल्हापूर विभागाचा 88.25 टक्के निकाल लागलेला आहे. 1 लाख 25 हजार 433 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 9 हजार 279 विद्यार्थी यावर्षी उत्तीर्ण झालेले आहेत. मागील वर्षी म्हणजे मार्च 2018 मध्ये 91 टक्के निकाल लागला होता. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत निकालात 3.88 टक्के इतकी घट झाली आहे.तसेच मुलं आणि मुली यांची तुलनात्मक स्थिती बघता मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 13. 75 टक्क्यांनी अधिक असल्याचेही आढळून येते. मागील वर्षीपेक्षा तीन टक्क्यांनी निकाल घटला आहे. यामध्ये सायन्सचे प्रश्न पत्रिकेचे बदललेले स्वरूप तसेच कृतीपत्रिका यांचा वापर यामुळे मुलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याची शक्यता विभागीय सचिव एस. एम. आवारी यांनी व्यक्त केली. शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखा 92%
कला शाखा 76%
वाणिज्य शाखा 88 टक्के
व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम 78 टक्के अशी टक्केवारी आहे.
संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व इतर साहित्याचे वाटप मंगळवार दिनांक 12 जून पर्यंत सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत त्याच दिवशी दुपारी तीन वाजता सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मूळ गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार असल्याचेही एस. एम. आवारी यांनी सांगितले.
Leave a Reply