
कोल्हापूर: बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. सर्व मुलामुलींनी आपण पास झाल्याचा आनंद व्यक्त केला व्यक्त केला. परंतु 72 व्या वर्षी रवींद्रबापू देशिंगे यांनीही बारावीची परीक्षा दिली आणि त्यात ते तीन विषय उत्तीर्ण देखील झाले. आर्ट्स म्हणजेच कला शाखेतून त्यांनी ही परीक्षा दिली होती. आणि यामध्ये त्यांनी तीन विषयांमध्ये उत्तीर्ण होऊन शिकण्यासाठी कोणत्याही वयाचे बंधन नसते फक्त तीव्र इच्छा असावी लागते हे दाखवून दिले आहे. दहावी झाल्यानंतर काही कारणाने त्यांना पुढचे शिक्षण करता आले. दोन वर्षाचा ऑटोमोबाईल डिप्लोमा त्यांनी केला. परंतु काही कारणाने त्यांना ते मध्येच शिक्षण थांबवावे लागले. परंतु आपल्या नातीच्या सांगण्यावरून त्यांनी पुन्हा बारावीची परीक्षा देण्याचे ठरवले. 2017 मध्ये त्यांनी अकरावी मध्ये प्रवेश घेतला त्यानंतर. त्यांनी बारावीची परीक्षा दिली. वयाच्या साठाव्या वर्षानंतर कोणती गोष्ट फारशी लक्षात राहत नाही असे म्हणतात. परंतु त्यांनी रोज नियमितपणे एक तास अभ्यास करून वयाच्या बहात्तराव्या वर्षी बारावी परीक्षा दिली हे नवलच आहे.
Leave a Reply