
कोल्हापूर: दक्षिण काशी असणाऱ्या श्री क्षेत्र अंबाबाई मंदिरांमध्ये केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडून हायटेक साऊंड सिस्टिमसाठी दीड कोटी रुपये नुकतेच मंजूर करण्यात आले आहेत. तुळजापूर, पंढरपूर आणि कोल्हापूर या तीन तीर्थक्षेत्रांच्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी या निधीसाठी प्रयत्न केले होते. परंतु कोल्हापूरमध्ये सर्वात आधी अशा प्रकारची साऊंड सिस्टिम बसवण्यात येणार आहे.
देशातील ही पहिली योजना असून देवस्थानकडून लवकरात लवकर ही ध्वनी योजना बसवण्यात येणार आहे. श्री क्षेत्र अंबाबाई मंदिराचे चारही दरवाजे, गाभारा नगारखाना, गरुड मंडप तसेच संपूर्ण मंदिरांमध्ये ध्वनी योजना वापरण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना असणाऱ्या सूचना, मंत्रोच्चार व सर्व विधी व्यवस्थित पद्धतीने ऐकायला येतील असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
Leave a Reply