
कोल्हापूर: दाभोळ ते बेंगलोर अशी केंद्र सरकारकडून नॅचरल गॅसची पाईप टाकण्यात येणार आहे. 2023 पर्यंत हे काम पूर्ण होणार असून ही गॅसची पाईप गांधीनगर जवळून जाणार आहे. तरी याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्याला व्हावा म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रयत्न केले. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्रजी यांच्यासमोर याबाबत प्रस्ताव मांडला. धर्मेंद्रजी यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच धर्मेंद्र प्रधान यांचे सचिव प्रकाश बेलवडे हे कोल्हापूरचे असल्याने त्यांनीही याबाबत लगेचच होकार दिला. आणि कोल्हापूरच्या सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी अतिशय स्वस्त इंधन कोल्हापूरला मिळणार आहे. आता गॅस सिलेंडर सातशे रुपयांना मिळतो परंतु जर या पाईपलाईनद्वारे कोल्हापूरला गॅस पुरवठा झाला तर याच गॅस सिलेंडर साठी फक्त तीनशे पन्नास रुपये मोजावे लागतील. महागाई कमी होण्यात सुद्धा याचा हातभार लागणार आहे. असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकल्पाचा व योजनेचा थेट लाभ प्रत्येक कुटुंबाला, कोल्हापुरातील उद्योग क्षेत्राला, हॉटेलसह सर्व क्षेत्रांना होणार आहे. तसेच अतिशय स्वस्त दरात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केल्याने खर्चात ही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.असेही संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले.
Leave a Reply