
कोल्हापूर : कोल्हापूर माहिती उपसंचालक पदी अनिरुध्द अष्टपुत्रे रुजू झाले असून शासनाची ध्येय धोरणे, विविध उपक्रम, लोककल्याणकारी निर्णय यांना व्यापक प्रसिध्दीच्या दृष्टीने विभाग अधिक गतीमान करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अनिरुध्द अष्टपुत्रे जिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग या पदावर कार्यरत होते. तेथून पदोन्नतीने त्यांची कोल्हापूर माहिती उपसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी ठाणे येथे सुमारे साडे तीन वर्षे जिल्हा माहिती अधिकारी या पदावरही काम केले असून कोकण विभागाचे प्रभारी उपसंचालक म्हणून ते काही काळ काम केले आहे. अष्टपुत्रे यांनी 20 वर्षापासून मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक आणि कालांतराने वरिष्ठ सहायक संचालक म्हणून काम पाहिले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही मुख्यमंत्री सचिवालयात त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. मंत्रालयात वृत्त शाखेत कार्य अधिकारी, दृक श्राव्य विभाग, अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने शाखा, महान्युज पोर्टल, यांचे कामही त्यांनी सांभाळले आहे. महासंचालनालयाकडील सुमारे 5 हजार दुर्मिळ आणि खुप जुन्या चित्रपट, वृत्तचित्र आणि माहितीपटांच्या डिजिटलाझेशनाचे काम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. अत्यकृष्ट कामाबद्दल त्यांना शासनाने दोन आगाऊ वेतनवाढी दिल्या आहेत. ठाणे येथे उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांना गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.
Leave a Reply