ही आपली मराठी संस्कृती आहे : खासदर धर्यशील माने

 

कोल्हापूर : राजू शेट्टी यांचा पराभव करणार्‍यांना सोडायचे नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकत्याने दिला असताना नूतन खासदार धैयशिल माने यांनी मात्र राजू शेट्टी यांच्या घरी त्यांच्या आईला भेटायला जाणे, शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांच्यासह सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांना रुचले नाही. त्यांनी खासदार माने यांनाच जाब विचारला. पण ही आपली मराठी संस्कृती आहे. असे सांगत खा. माने यांनी सर्वांची समजूत काढली.

     खा. धैर्यशिल माने यांनी गुरुवारी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण या बाबत कार्यकत्यांशी चर्चा न करता खासदार माने यांनी केलेली कृती शिरोलीतील शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे असूनही खासदार माने यांना निवडणूकीत मदत केलेेले. सरपंच शशिकांत खवरे यांच्या कार्यकर्त्यांना हे रुचले नाही. याबाबत सरपंच खवरे यांनी स्वत: नाराजीचा एक मजकूर तयार करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. हा मजकूर खासदार माने यांच्यार्पंत गेल्यानंतर ते स्वत: आज सकाळी सरपंच शशिकांत खवरे यांच्या घरी आले. याठिकाणी सरपंच शशिकांत खवरे शिवसेनेचे मुकुंद नाळे, संतोष बाटे, शिवाजी पोवार, भाजपचे सतेज पाटील, संदीप पोर्लेकर यांनी खासदार माने यांना राजू शेट्टी यांच्या घरी जाण्याच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करताना स्वाभिमानाची लढाई आणि पक्षाची निष्ठा म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. खवरे यांनी काँग्रेस पक्षाचा कार्यकता असताना आपला प्रचार करुन निवडणून आणले आहे असे असताना आणि राजू शेट्टी हे सर्वांशी मग्रुरीने वागून तुमच्यावरही जहरी टिका केली असताना तुम्ही त्यांच्याकडे का गेला असा जाब विचारला.

     यावर खासदार धैयशिल माने यांनी ही आपली मराठी संस्कृती आहे. थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद घेणे हे संस्कार आहेत. त्यांचा घरी गेलो म्हणजे मी त्यांचा झालो किंवा ते आपल्यात आले असे होत नाही. त्यांनी माझ्याबरोबर आमच्या कुटुंबियावर केलेल्या टिकेने आम्हीही व्यथित झालो होतो. तरीही निवडणूका संपल्याकी मताचे राजकारण संपावे, वैरत्व कायम मनात ठेऊ नये. अशी खीलाडू वृत्ती घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. तरीही मी सदैव विकासाचे काम व शेतकर्‍यांचे प्रश्न यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्यासोबत व पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहेत. कार्यकर्ताम्हणून मी आपल्या भावना समजू शकतो. मी संपूर्ण मतदार संघाचा खासदार आहे. माझ्या या कृतीचे संपूर्ण देशात स्वागत झाले आहे. आपणही गैरसमज करुन घेऊ नका. असे सांगितले. यावेळी विठ्ठल पाटील, सरदार मुल्ला, अविनाश कोळी, संभाजी भोसले आदी शिवसेना-भाजप व खवरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!