
कोल्हापूर: कोल्हापूर येथील रिपब्लीकन सोशल फाउंडेशन यांच्यावतीने ‘आंबेडकरी चळवळ वर्तमान वाटचाल आणि दिशा’ या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये सतत सक्रीय असणारे आयु.संजय जिरगे यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. दसरा चौक येथील शाहु स्मारक भवन येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सत्कारमूर्ती संजय जिरगे व छायाताई जिरगे यांच्यासह फाउंडेशनचे अध्यक्ष व रिपब्लीकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जेष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्रा. डॅा. हरिश भालेराव, प्रा. डॅा. अच्युत माने, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे, पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव रुपाताई वायदंडे, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष विश्वासराव देशमुख, मल्हार सेनेचे बबन रानगे, पीपल्स रिपब्लीकनचे दगडू भास्कर, स्वाभिमानी संघटनेचे नेते भगवान काटे यांच्यासह विविध संघटनेचे नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply