
कोल्हापूर : प्रांत ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या राज्यात ग्राहक जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात पुढील तीन महिन्यात तालुकास्तरावर मेळावे, पत्रके वाटप करून ग्राहक राजा जागा होण्यासाठी आणि ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांना जागृत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगत आज संपूर्ण देशभरात ग्राहकांची वेगवेगळी आमिष दाखवून फसवणूक पिळवणूक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्राहक हा बाजार पेठेत केंद्रबिंदू असून याला तो अज्ञानी आहे असे विक्रेत्यांचे विचार झाले आहेत. ग्राहक हा राजा आहे आणि त्याचे अधिकारी जतन व्हायला हवेत. म्हणून आम्ही या माध्यमातून ग्राहक जनजागृती अभियान राबवत आहोत अशी माहिती प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली .
या अभियान अंतर्गत ग्राहकांच्या अधिकाराची जाणीव करून दिली जाणार असून ग्राहकांच्या हक्क काय आहेत ,कशी फसवणूक होते ,ती कशी रोखता येऊ शकते ,ग्राहकांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात हे अभियान काम करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष भोसलेजी यांनी सौ.हसीना शेख यांची प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड केल्याचे जाहीर केले.सुभाष भोसले यांचीही कोल्हापूर राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचेही जाहीर केले. यावेळी निवड झालेल्यांचा मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी विधी विभाग अध्यक्ष ऍड. शशिकांत माने,उत्तर भारत अध्यक्ष आण्णा डागर,जाहिदा मुजावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply