निसर्गचित्रांच्या कलाकृतीतून अजरामर राहिलेल्या स्व. प्रथमेश आंबेकरच्या चित्रप्रदर्शनाला आजपासून सुरवात

 

कोल्हापूर: मस्कुलर डिसऑयनर या सारख्या अतिशय दुर्धर आजाराशी झुंजत त्यानं अप्रतिम निसर्ग चित्र रेखाटली.त्याच्या इच्छेनुसार आज कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं ऊर्जा निसर्गाची या चित्रप्रदर्शनाच आयोजन करण्यात आलं होतं. आंबेकर कुटुंबियांच्या पुढाकारातून चित्र प्रदर्शन साकारलं. आज मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाच उद्घाटन करण्यात आले.लाखात एखाद्याला होणारा आजार त्याला जडला. मस्कुलर डीसऑनर या आजारानं हळूहळू त्याच्या शरीराचे अवयव जखडत जाऊ लागले.अचानक त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.पण खचून जाणारा तो बहाद्दर निश्चितच नव्हता. नियतिला देखील त्यान आवाहन दिले. प्रचंड मानासिक ताकदीच्या जोरावर एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून त्यानं लौकिक मिळवला. निसर्गचित्रकार म्हणून नावारूपास आलेला प्रथमेश आंबेकर आज जरी या जगात नसला तरी निसर्ग चित्र रूपाने तो जिवंत आहे. त्याच्या या चित्रांच प्रदर्शन शाहू स्मारक भवन इथं भरवण्यात आलयं. आज या प्रदर्शनाचे उद्धाटन रोटरी सेंट्रलचे आर.वाय पाटील,मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, उद्योजक संग्राम पाटील, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.’ ऊर्जा निसर्गाची ‘ या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आंबेकर कुटुंबीयांनी चित्रकार स्वर्गीय प्रथमेश आंबेकर यांची स्मृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.प्रथमेशच्या आठवणींचा हा आनंद सोहळा आहे. या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दिव्यांगांना मदत करण्याचा आंबेडकर कुटूंबियांचा हेतू उदात्त असल्याचं रोटरी सेंट्रलचे आर.वाय.पाटील, वसंतराव मुळीक, प्रेस क्लब अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले.डी.एम.आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केलं. प्रथमेशच्या कुंचल्यातून उतरलेली सुमारे ३०० पेक्षा अधिक चित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.या चित्रांचा आनंद मान्यवर आणि कला रसिकांनी घेतला.विजय पाटील, आर वाय पाटील, वसंतराव मुळीक, डी एम आंबेकर, हेमंत दळवी,चंद्रकांत सूर्वे, दीपक बोगार, पत्रकार प्रमोद व्हनगुत्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश आंबेकर,दादासाहेब पाटील, अनिकेत खाडे, प्रणव खाडे, मोहन पाटील, अभिषेक घोरपडे यांच्यासह आंबेकर कुटूंबिय आणि कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!