कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर दुपारी 2 वाजता आगमन झाले. यावेळी त्यांचे विमानतळावर उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी पुणे म्हाडचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

Leave a Reply