
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक 13 जून 2019 रोजी दुपारी 2 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे अगामन व मोटारीने श्री. छ. शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागलकडे प्रयाण. 2.25 वाजता श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन, श्री. छ. शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल येथे गामन. 2.30 वाजता स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण समारंभास उपस्थिती. 2.40 वाजता मोटारीने श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल पटांगणाकडे प्रयाण. 2.45 वाजता स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा अनावरण समारंभ व शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. 3.35 वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. 3.55 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 4 वाजता हेलिकॉप्टरने ता. वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. 6.05 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
Leave a Reply