संशयास्पद संदेश नाही तर प्रेम संदेश

 

कोल्हापूर : जुना राजवाड्याचे पीआय अनिल देशमुखांनी कालच्या कॉमर्स कॉलेजच्या दारात रस्त्यावर शुभेच्छा सन्देश लिहिला होता .संशयास्पद असल्याने  याची चौकशी करून सदर विषयी गुन्हा नोंद करुन तपास करावा अशी मागणी बजरंग दलाचे बंडू साळोखे व महेश उरसाल यांनी केली होती. ISIS असा शॉर्ट संदेश संशयास्पद मजकूरामुळे शहरात तणाव निर्माण झाला.अतिरेकी संघटनाचे नाव अशा प्रकारे लिहणे याची चौकशी करावी तसेच अशा प्रकारे रस्त्यावर  ग्रुपचे नाव लिहणे अशा हुल्लडबाजी ला आळा घातला पाहिजे आणि याची गांभीर्याने दखल घेतली जावी अशी मागणी बजरंग दलने केली होती. असा गुन्हाही नोंद केला आहे. मजकुराबाबत  खुलासा केला आहे की हा प्रकार प्रेम प्रकरणातुन केला आहे , मुलाचे  आणि मुलीच्या नावाचे पाहिले अक्षर  असल्याचे समजले आहे .तिच्या वाढदिवसासाठी त्याने लिहिले आहे आणि तिला फोन करून सांगितले की तुझ्यावरच्या प्रेमासाठी उद्या कॉलेजवर येऊन बघ.पोलिसांनीतसा रिपोर्ट पाठविला आहे.त्यामुळे संशयास्पद सन्देश असल्याचा संशयावर आता पडदा पडला आहे.पण अशा प्रकरांना आळा घालावा आणि त्या संबंधित मुलावर कारवाई व्हावी अशी मागणी बजरंग दल ने केली आहे.Screenshot_2016-01-04-22-55-53

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!