
मुंबई :वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांकडून आता दंड रोख रक्कमेत घेतला जाणार नाही. यासाठी क्रेडीट किंवा डेबिट कार्डचा वापर केला जाणार आहे. ही विशेष व्यवस्था मुंबईत १२जानेवारीपासून लागू होणार आहे. यासाठी ई-चलानच्या १००० मशीन मुंबई वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत.एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, जर वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकाकडे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड नसल्यास त्यांना १५ दिवसांचा कालावधी देण्यात येईल. वाहनचालकाला या १५ दिवसात एनईएफटीद्वारे थेट नेट बँकिंगने वाहतूक पोलिसांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे लागणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, फक्त भष्ट्राचारालाच आळा नाही बसणार नाही तर वारंवार नियम तोडणाऱ्यांचीही ओळख या नव्या व्यवस्थेमुळे पटविता येणार आहे. दरम्यान, तेलंगणा आणि तामिळनाडू मध्ये ही व्यवस्था आधीच लागू करण्यात आल्यामुळेच आता मुंबई पोलिसांनीही याची जोरदार तयारी केली आहे.
Leave a Reply