
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांचा पराभव करून पहिल्यादांच लोकसभेत गेलेले तरुण खासदार धैर्यशील माने यांनी काल सभागृहात दुसऱ्यांदा भाषण केले. त्यांच्या पहिल्या भाषणाप्रमाणे हे देखील प्रभावी ठरले. केंद्रसरकारने माहिती अधिकारांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्यावर सोमवारी संसदेत चर्चा झाली. यामध्ये शिवसेनेच्या वतीने धैर्यशील माने यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून सभागृहात प्रभावित केले. यावेळीबोलताना, माहिती अधिकार कायद्याचा चांगला उपयोग होतो आणि दुरुपयोग करणाऱ्यांची संख्याही कमी नाही पण पारदर्शक सरकार चालवण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. केंद्रीय पातळीवर अकरापैकी चार आयुक्त कार्यरत आहेत. त्यामुळे या कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणे प्रलंबित आहेत. एकट्या महाराष्ट्रात सोळा हजार प्रकरणे प्रलंबित असे सांगत खा.माने म्हणाले, कायदा झाला त्यावेळी कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. जो कार्यकर्ता चांगल्या भावनेने या कायद्याचा वापर करीत असेल त्याला कायद्याने संरक्षण मिळाले पाहिजे; पण कोणी गैरवापर करत असेल, तर त्याला लगाम लावण्याची जबाबदारीही सरकारची आहे. धैर्यशीलमाने यांनी सात मिनिटे केलेल्या मांडणीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी,” माननीय सदस्यांनी (धैर्यशील माने) पहिल्यांदा निवडून येऊनही चांगली मांडणी केली” अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. यावर सभागृहीत उपस्थित इतर खासदारांनीही मानेंना दाद दिली. याचभाषणादरम्यान चांद्रयान-2 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाची बातमी लोकसभेत आली असताना खा.माने यांनी इस्रोचे व भारत सरकारचे अभिनंदन केले.
Leave a Reply