
कोल्हापूर : कोल्हापूरच्या मातीने भारतीय क्रीडा क्षेत्राला विविध खेळांच्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव उंचावणारे अनेक जण आहेत. पण काही खेळाडूंमध्ये जिद्द, चिकाटी असते पण ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांची शारीरिक क्षमता किंवा दुखापत अडथळा बनून उभी राहते. नेहमीच खेळाडूंना सराव हा करावाच लागतो. त्यात दुखापत होतच राहते. पण यावर मात करून पुन्हा उभे राहणे महत्त्वाचे असते. यासाठी प्रत्येक खेळासाठी वेगवेगळ्या स्नायूंना ट्रेंड करावे लागते. आणि स्नायू बळकट व पोषक कसे ठेवावे हे फिजिओथेरपिस्ट शिवाय अजून उत्तम प्रकारे कोणीच सांगू शकत नाही.आपली शारीरिक क्षमता पुरेपूर कशी ठेवावी यालाच ‘फिजिकल डायट’ असे म्हणतात. त्यासाठी फिजिओथेरीपीस्टची साथ मोलाची ठरते. म्हणूनच येत्या रविवारी २८ जुलै रोजी कोल्हापुरातील हीलींग टच फिजिओ क्लीनिक आणि डॉ. लाल पॅथ लॅबच्या वतीने सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फिजिओथेरपिस्ट डॉ. ऋषिकेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ताराबाई पार्क येथील रिषी रेसिडेन्सी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिरातील सहभागी रुग्णांना वैद्यकीय सल्ला (कन्सल्टिंग फी) पूर्णतः मोफत दिला जाणार आहे. तसेच अतिशय माफक दरात उपचार केले जाणार आहेत.
आजवर डॉ. ऋषिकेश जाधव यांनी वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापर करून हजारो रुग्णांच्या शारीरिक व्याधींवर उपचार केले आहेत. याचा लाभ अनेक रुग्णांनी घेतला असून ते आज पूर्णतः बरे झाले आहेत. आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त आहेत. तरी या शिबिरात सहभागी होण्यासाठी 97 65 57 76 00 किंवा 88 55 90 09 98 या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पोर्ट्समन, पोलीस भरती केव्हा सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या व ज्यांना दुखापत किंवा सांधेदुखी आहे अशांनी प्राध्यान्याने यात सहभागी व्हावे,असे आवाहनही डॉ. जाधव यांनी केले. पत्रकार परिषदेला डॉ. जया पाटील,डॉ. संदीप मंगृले,शुभम बुवा,विशाल दड्डीकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply