
नवी दिल्ली : इचलकरंजी येथील वस्त्रोउद्योग क्षेत्राचे पुनर्जीवन करणे, कृषी क्षेत्रात ऊसाचे एफआरपी दर वाढवून मिळावेत व पंचगंगानदी स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रीय मोहिम राबविण्यात यावी या प्रमुख समस्यांवर चर्चा करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील खासदार श्री. धैर्यशील माने यांनी आज दुपारी संसदेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व उपरोक्त विषयांवर स्वतंत्ररित्या निवेदने सादर केली.
वस्त्रोउद्योग क्षेत्राबाबत श्री. मोदी यांचेशी चर्चा करतांना श्री. माने यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून इचलकरंजी शहर व परिसरातील वस्त्रोउद्योग हा अडचणीत आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या कापडाला बाजारात मागणी नसून , त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजार भाव मिळत नाही. यामुळे त्यांना स्वत:चे उत्पादित केलेला माल कमी भावात विकावा लागत आहे. अशा यंत्रमाग धारकांना पुनर्जीवीत करण्यासाठी योग्य ते धोरणात्मक निर्णय म्हणजेच जी.एस.टी दरामध्ये सुती व मानव निर्मित धाग्यामध्ये जी तफावत आहे ती दूर करण्यात यावी. वस्त्र आयात-निर्यातीच्या धोरणामध्ये योग्य तो बदल व्हावा, TUFS योजेनेअंतर्गत सध्या जी 10 टक्के अनुदान आहे तो पूर्वी प्रमाणे 30 टक्के करण्यात यावा, सूत दरामध्ये स्थिरता यावी या करीता काही कठोर उपाय करावेत अशी विनंती त्यांनी यावेळी मा. पंतप्रधानांना केली. निवेदन सादर करताना श्री. माने यांनी देशामध्ये ऊस उत्पादक शेतक-यांना सध्या असलेली एफ.आर.पी मध्ये वाढ करण्यात यावी कारण त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये भरघोस वाढ झालेली आहे. या व्यतिरिक्त एफ.आर.पी प्रमाणे ऊसाच बिले वेळेत मिळत नसून अद्यापी सन 2018-19 मधील हजारो कोटींचे बिले देय असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर बिले वेळेत मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. साखर कारखान्यांची परिस्थिती पाहिलेस त्यांच्या पुढे असणा-या अनेक समस्यांमुळे साखर कारखानेही आर्थिक कोंडीत सापडलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी पंचगंगा आहे. या नदीच्या माध्यमातूनच तेथील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. परंतू दुर्दवाने गेल्या काही वर्षापासून ती प्रदर्षीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळत नाही. म्हणून तातडीने पंचगंगा प्रदर्षण मुक्ती करीता राष्ट्रीय मोहिम राबवावी अशी विनंती खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधानांना केली व यावेळी या नदीचे पुनर्जीवन व शुध्दीकरण करण्यासाठी हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याबाबतची विनंती त्यांनी मा. पंतप्रधानांन कडे केली. यावेळी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या सर्व विषयांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
Leave a Reply