
कोल्हापूर : कर्करोग टाळण्यासाठी रोजच्या आहारातूनच योग्य ते पोषक घटक शरीरात जाणे गरजेचे असते. योग्य आहारच कर्करोग टाळण्यास मदत करतो हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे कर्करोग उपचारामध्ये ओमेगा ३ फेटी अॅसिड महत्वाची भूमिका बजावतो. उपचारामध्ये व उपचाराच्या नंतर रुग्णांना निरोगी ठेवण्यासाठी मदत होत असल्याचे मत अॅपल सरस्वती हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉ. निखील गुळवणी यांनी सांगितले.
योग्य आहार पद्धतीमध्ये ५० टक्के भाग सॅलेड (फळभाज्या) तर २५ टक्के भाग कडधान्य तर २५ टक्के भाग प्रोटीनचा असायला हवा. पालेभाज्या तसेच फळे यांचा समावेश रोजच्या आहारात हवा तसेच चिकन- मटन यांसारख्या नॉनव्हेज पदार्थामधून मिळणारे प्रोटीन आवशक असले त्याचे प्रमाण कमी हवे तसेच शरीराला वयाच्या ८ पर्यंत दुध हे पोषक व पूर्णअन्न ठरू शकते परंतु त्यानंतर दुधाची फारशी गरज शरीराला नसते त्यामुळे आहारातील दुधाचे प्रमाणही अल्प असावे. मॉल किंव्हा अन्य ठिकाणच्या प्रीझ्र्व्ह केलेले फूड खाणे घातक ठरू शकते त्यामुळे प्रीझ्र्व्ह फूड टाळावे.
कर्करोगी मध्ये कुपोषण आढळते यामुळे उपचाराला अडथला येतो. कुपोषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अतिउच्च पोषणाची गरज असते. ते ओमेगा ३ फेटी अॅसिड पुरविते. कर्करोगी रुग्णांना भूक न लागणे दुबळेपणा, वजन कमी होणे अशी लक्षणे आढळतात. अनोरेक्सिया हे लक्षण सामान्य आहे. ओमेगा ३ फेटी अॅसिड निर्माण करू शकत नाही त्यामुळे पूरक अशा अन्नातून शरीरात जाणे गरजेचे आहे. हे अॅसिड ट्युमर विकसित पेशींना घटविते व रोगप्रतिकार शक्ती वाढवते. रुग्णांना अनेकदा हे पोषणाच्या नसांच्या किंवा ट्यूबद्वारा दिले जाते. यामुळे नागरिकांनी आहातून योग्य पोषक घटक शरीरात जातील याकडे लक्ष द्यावे असे हि त्यांनी यावेळी सांगितले.
मात्र, अनेकदा अनेक सोशल माध्यमातून किंव्हा लोकांच्याकडून पोषण आहार कसा घ्यावा याबाबत सल्ला किंव्हा पोस्ट व्हायरल केल्या जातात याबाबतहि नागरिकांनी सावधान राहावे. जे पोषण आहार (डायेट) फॉलो करणार आहात याबाबत आपल्या जवळच्या योग्य त्या अधिकृत आहार तज्ञकडून माहिती करून पूर्ण खात्री करूनच उपाय करावेत असे आहार तज्ञ डॉ. रुफिनो कुटीनो यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply