मुंबई : येथे सर्वत्र शुक्रवार संध्याकाळपासून मुसळधार पावसामुळे आणि आज शनिवारी सकाळीसुद्धा अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. यामध्ये अनेक रेल्वे ट्रकवरही पाणी आल्यामुळे अनेक ट्रेन उशिराने धावत आहेत. पावसामुळे मुंबईत येणारी १७ विमान उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली आहेत. हवामान खात्याच्या अंदाजाने पुढील काही दिवसांमध्ये आणखी जोरदार पाऊसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामध्ये वांगणी-बदलापूर रेल्वे मार्गावर महालक्ष्मी एक्स्प्रेस तब्ब्ल १७ तास अडकून राहिली आहे . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनमध्ये जवळपास ७०० हुन अधिक प्रवासी अडकले होते, आता त्या सर्वांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आले आहे. नौदलाची ८ बचाव पथकं, ३ पाणबुड्यांचे पथके आणि एक सी किंग हेलिकॉप्टर बचावकार्यात लागले होते. या प्रवाशांध्ये ९ गरोदर मातांचाही समावेश आहे. त्यांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शनिवार आणि रविवारी राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यामुळे जनतेने आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply