
कोल्हापूर : दुसऱ्या महायुध्दाच्या काळात पोलंडच्या काही रहिवासीयांना १९४३ ते ४७ या दरम्यान चौथे शिवजी आणि छत्रपती शहाजी महाराज यांनी आपल्या संस्थानातील वळीवडे येथे राजाश्रय दिला होता.यातील २० लोक आजही हयात आहेत. येत्या १४ सप्टेंबर रोजी, पोलंडचे उपपंतप्रधान पियोट्र ग्लींस्की यांच्यासोबत हे २० पोलंड चे रहिवासी कोल्हापुरच्या भेटीस येणार आहेत, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तीन महिन्यापूर्वी पोलंडचे राजदूत अँँडम बुराकोव्स्की आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत याबाबत चर्चा करण्यात आली होती.रायगड वरील शिवराज्याभिषेक सोहळ्यातही त्यांचा सहभाग होता.यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना ‘स्टेट गेस्ट’ चा सन्मान देऊन राज्य स्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्यावेळचा इतिहास उजागर व्हावा या उद्देशाने वळीवडे येथे वस्तू संग्रहालय बांधण्यात येणार आहे. तो काळ जसा च्या तसा डोळ्या समोर उभा राहावा, तसेच पोलंडची बांधकाम शैली आणि रचनेचा विचार करुन हे संग्रहालय बांधण्यात येण्यात आहे. यासाठी तत्काळ एक कोटी रु. मंजुर करण्यात आले असुन लवकरच बांधकामास सुरवात होणार आहे. या सगळ्यामुळे कोल्हापूर, महाराष्ट्र आणि भारताचे पोलंडबरोबर असणारे संबंध आणखीनच द्रुढ होतील. कारण गरजेच्या वेळी कोल्हापूर आणि जामनगर यांनी केलेल्या मदतीचे ऋण फेडायचे आहे, अशी पोलंड वासियांची भावना आहे. याचा नक्कीच कोल्हापुरातील उद्योग तसेच शिक्षण क्षेत्राला फायदा होणार आहे असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
Leave a Reply