
कोल्हापूर : लवकरच सुरू होणारे हॉटेल अन्नपूर्णा एक्झिक्युटिव्ह शौकिन खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरविणार असल्याची माहिती पुबालन नायडू यांनी आज येथे दिली.१९९१ पासून हनुमान फास्ट फूडच्या माध्यमातून आपली स्वतंत्र अशी ओळख असलेल्या व ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कच्या यशस्वी व्यवस्थापनानंतर नायडू ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली वडणगे फाटा येथील पेट्रोल पंपालगत असणाऱ्या हॉटेल अन्नापूर्णाचे येत्या तीन ऑगस्टला अभिनेता हार्दिक जोशी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. त्यानिमित्त हॉटेलसंबंधी अधिक माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, ग्राहकाला नवनवीन चविष्ट पदार्थ देण्याचा प्रयत्न आणि पैशाचे पूर्ण समाधान हा हेतू समोर ठेवून सुरू केलेल्या या हॉटेलमध्ये व्हेज, नॉनव्हेज आणि बार असे स्वतंत्र तीन विभाग असतील. स्वच्छ वातावरण, विनम्र सेवा आणि हायजेनिक फूड असणाऱ्या या हॉटेलमध्ये ग्राहकाला नाष्ट्याचे २५० प्रकार, तर पाच प्रकारची जेवणाची थाळी तृप्त करेल. येथे एकाचवेळी जवळपास २०० जण ग्रुपने जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील.ते म्हणाले, सकाळी सहा ते रात्री ११ या वेळेत सुरू असणाऱ्या या हॉटेलची खासियत ही आहे की, तुम्ही येथे येण्याची वेळ कोणतीही असली तरी तुम्हाला फ्रेश आणि गरमागरम नाष्टा आणि जेवण हमखास मिळेल. फास्ट फूड ते जेवणामध्ये शाकाहारी-मांसाहारी प्रकारात अगदी ए टू झेड डीश येथे मिळतील. फॅमिलीसाठी सुरक्षित आणि छोट्या मुलांसाठी बगीचा ही आमच्या येथील विशेषता आहे. लवकरच टेरेस बार आणि लॉजिंगही सुरू करण्याचा मानस आहे.दरम्यान, ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कला ग्राहकांनीही जो प्रतिसाद दिला, तोच प्रतिसाद आम्हाला मिळेल असा विश्वास आहे. शनिवारी (ता. ३) सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल अन्नपूर्णा एक्झिक्युटिव्हच्या उदघाटनप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. नायडू यांनी केले. तमिळनाडू येथे प्रसिद्ध असणारी सापड थाळी लवकरच सुरू करणार आहोत. यामध्ये भात, सांबर, रस्सम, सुकी भाजी, पापड, पायसम असे पदार्थ असतील. असे श्री.नायडु यांनी सांगितले.
Leave a Reply