राधानगरीत 99 टक्के भरले ;नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

कोल्हापूर  : राधानगरी धरण आज सकाळी 7 वाजता 99 टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी यांनी दिला आहे.
पंचगंगा नदीची राजाराम बंधार्याजवळील इशारा पाणी पातळी पहाटे 2-20 वा 39फूट इतकी नोंदवली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासात राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे स्वंयचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. हे दरवाजे उघडल्यास पंचगंगा नदी धोका पातळी 43 फूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी व सखल भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!