
कोल्हापूर : हॉटेल यशस्वीपणे चालवण्याच्या पॅशनमुळे संदेश दुर्गे हे ओयो हॉटेल्स अँड होम्स या भारतातील सर्वात मोठ्या हॉटेल साखळीशी जोडले जाण्यासाठी प्रेरित झाले. लंडनमधील बेडफर्डशायर युनिव्हर्सिटीतून एमबीए झालेले संदेश, हॉस्पिटॅलिटी व्यवसाय करण्यासाठी भारतात परतले. उद्योजकता व सहयोग यांनी प्रेरित असणाऱ्या संदेश यांनी ओयो टीमबरोबर काम केले व या टीमने त्यांना ओयो 3285 हॉटेल रेडिअंट हे त्यांचे सध्याचे हॉटेल प्रमाणित करण्यासाठी मदत केली.आपला अनुभव सांगताना संदेश दुर्गे म्हणतात, “माझे हॉटेल मोक्याच्या ठिकाणी आहे व त्यामुळे ते सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी सोयीचे आहे. आमच्या हॉटेलमध्ये 50 खोल्या आहेत. त्यामध्ये स्विमिंग पूल, बँक्वेट हॉल, कॅफेटेरिया, मल्टि-क्युझन रेस्तराँ अशा सुविधा आहेत. माझ्या हॉटेलमध्ये 35% कॉर्पोरेट बुकिंग होतात आणि त्यातील बहुसंख्य ग्राहक वारंवार येणारे आहेत. माझ्या कुटुंबाचे अनेक व्यवसाय असून, मी हॉटेल व्यवसाय पाहतो. ओयोबरोबरचे नाते पोषक व लाभदायक आहे. त्यामुळे मला शाश्वत व्यवसायासाठी मदत झाली आणि स्थिरपणे ऑक्युपन्सी मिळाली.”सांस्कृतिक व ऐतिहासिक पैलूंमुळे कोल्हापूर हे पर्यटनाचे ठिकाण बनले आहे. या शहरात लहान व मोठ्या आकाराचे उद्योगही आहेत व त्यामध्ये वस्त्रोद्योग सर्वात लोकप्रिय आहे. एक शहर म्हणून, सर्वोत्तम अन्नपदार्थ व निसर्गरम्य ठिकाणे असलेले कोल्हापूर पर्यटनासाठी आदर्श आहे.ओयो 41164 हॉटेल सार्थकी एक्झिक्युटिव्हचे मालक कमलेश शिरवडेकर यांनी सांगितले, “दोन वर्षांपूर्वी मी कर्ज घेतले आणि एक प्लॉट खरेदी केला. त्यामध्ये मूलभूत बांधकाम केले. या वर्षी मी माझी मालमत्ता ओयोमध्ये समाविष्ट केली. ओयोने मला माझ्या हॉटेलची पूर्ण क्षमता आजमावण्यासाठी मदत झाली. ग्राहकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करेल आणि त्यांना अविस्मरणीय अनुभव देईल, असे हॉटेल उभे करणे, हे माझे स्वप्न होते. आज, माझ्या हॉटेलमध्ये 10 खोल्या आहेत, 200 असनी कॉन्फरन्स हॉल आहे, इन-हाउस रेस्तराँ आहे आणि लवकरच टेरेस गार्डन पूर्ण केले जाणार आहे. ओयो आणि टीमच्या पाठिंब्यामुळे हॉटेलचा उत्तम व्यवसाय होत असून हॉटेलला आदर व चांगले ग्राहक लाभले आहेत.”ओयो हॉटेल्स अँड होम्स ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी, चीनमधील दुसरी सर्वात मोठी व जगातील तिसरी सर्वात मोठी व झपाट्याने वाढती लीज्ड व फ्रेंचाइज्ड हॉटेल, होम्स व लिव्हिंग स्पेसेसची साखळी असून ती संदेश व कमलेश यांच्यासारख्या मालमत्ता मालकांना सक्षम करत आहे. या दोन यशोगाथा म्हणजे ओयो आपल्या मालमत्ता मालकांची कदर कशा प्रकारे करते व त्यांची व्यवसायाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी कशा प्रकारे पाठिंबा देते, याचे उत्तम उदाहरण आहे.कंपनीने मालमत्ता मालकांशी असणारे नाते सक्षम करत असून, कंपनीने अलीकडेच ओयो पार्टनर एंगेजमेंट नेटवर्क (ओपन) हा वर्षभराचा उपक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये भारतातील 10000+ मालमत्ता मालकांसाठी 6 कोटीहून अधिक आश्वासने देण्यात आली आहेत (केवळ भारतासाठी). ओयोने मालमत्ता मालकांसाठी अपग्रेडेड ओयो अॅप दाखल केले. हे अॅप व्यवसाय व ग्राहक याबाबतच्या निकषांबद्दल संपूर्ण माहिती देते. या अॅपमुळे स्टँडअलोन हॉटेलांची गुणवत्ता वाढण्यासाठी आणि सरासरी ऑक्युपन्सी 25% वरून 65% पर्यंत वाढण्यासाठी, कमी वापर होणाऱ्या मालमत्तांवरील उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता मालकांना मदत होते.हॉटेलमध्ये एलईडी टेलिव्हिजन, एसी, वाय-फाय, सीसीटीव्ही, डिश टीव्ही. दर्जेदार लिनेन अशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी अतिरिक्त पाठिंबा देण्याबरोबरच, ओयो मालमत्ता अधिक चांगली करण्यासाठी आर्थिक पाठबळही पुरवते. यामुळे, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये सूक्ष्म-उद्योजक घडवून टिअर 2 व 3 या शहरांत हजारो नोकऱ्या निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे. परिणामी आर्थिक वाढीला चालना मिळणार आहे.
Leave a Reply