Entertainment

कोल्हापुरचे सुपूत्र प्रसिध्द गायक रविंद्र शिंदे यांचा शनिवारी नागरी सत्कार

February 8, 2023 0

कोल्हापूर: शाहूपुरीमध्ये जन्मलेल्या रविंद्र शिंदे यांनी महापालीकेच्या शाळेत शिक्षण घेतले. उदरनिर्वाहासाठी रविंद्र यांनी वर्तमानपत्र टाकली, टू व्हीलर मॅकेनिक, आणि नंतर ट्रान्स्पोर्ट कंपनीत काम करत रविंद्र शिंदे यांनी संगीत साधना केली. राजर्षि शाहू संगीत विद्यालयात संगीताचे […]

News

प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरगावकर पेट्रोल पंपावर डिझेल १ रु व पेट्रोल २ रु.स्वस्त

February 7, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरगावकर पेट्रोल पंपावर डिझेल १ रु व पेट्रोल २ रु. स्वस्त दराने २६ जानेवारी रोजी दिवसभर हा उपक्रम राबविण्यात आला. हा स्वस्त दराच्या उपलब्धतेचा बोर्ड कोरगावकर पेट्रोल पंपावर २६ जानेवारीपूर्वी एक आठवडा अगोदर […]

News

महाटेक २०२३ औद्योगिक प्रदर्शन ९ फेब्रुवारीपासून

February 7, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी – १९ व्या महाटेक २०२३ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालय पटांगनावर दि.९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे महाटेक औद्योगिक प्रदर्शन प्रदर्शन […]

News

बजरंग दलाच्यावतीने महाशिवरात्रीला पावनगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 7, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: ज्याप्रमाणे विशाळगडाची अवस्था झाली आहे त्याप्रमाणे पावनगडाची अवस्था होऊ नये म्हणून या वर्षीपासून विश्व हिंदू परिषद बजरंग दल पावनगड, तालुका पन्हाळा येथे महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री साजरी करणार असून येत्या १७ तारखेला रात्री नऊ ते […]

News

कायमस्वरूपी ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडवू : आम.जयश्री जाधव

February 4, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ड्रेनेज लाईन संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. ड्रेनेज लाईन खराब असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. त्यामुळे आज पर्यंत दोन कोटीहून अधिक रुपयांचा आमदार निधी शहरातील ड्रेनेज लाईन साठी […]

News

सिध्दगिरी येथील ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; दहा लाख लोक भेट देणार

February 3, 2023 0

सिध्दगिरी येथील ‘ सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती कोल्हापूर / प्रतिनिधी : सिद्धगिरी मठ कणेरी येथे येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेला ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर […]

News

सिद्धगिरी हॉस्पिटलमधे अत्याधुनिक सिद्धगिरी जननी आयव्हीएफ सेंटरचा लोकार्पण सोहळा

February 3, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या  ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली […]

News

सु.रा.देशपांडे स्मृती पुरस्कार रविंद्र जोशी यांना जाहीर;अशोक नायगावकरांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

February 2, 2023 0

कोल्हापूर :आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार, दुर्ग अभ्यासक आणि शिक्षक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले जनसंपर्क अधिकारी सु. रा. देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार यंदा अक्षर दालनचे रविंद्र जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. ख्यातनाम […]

No Picture
Uncategorized

सु.रा.देशपांडे स्मृती पुरस्कार रविंद्र जोशी यांना जाहीर                              कोल्हापूर:आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार, दुर्ग अभ्यासक आणि शिक्षक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले जनसंपर्क अधिकारी सु. रा. देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार यंदा अक्षर दालनचे रविंद्र जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. ख्यातनाम कवी अशोक नायगावकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता राम गणेश गडकरी सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती डाॅ. सागर देशपांडे यांनी पत्रकातून दिली. ११ हजार रूपये रोख आणि मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.             शिक्षण, इतिहास, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कामगिरी केलेल्या सु. रा. देशपांडे यांच्या सहाव्या स्मृतीदिनी हा कार्यक्रम होणार असून जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.गेली ४५ वर्षे जोशी हे ग्रंथवितरण क्षेत्रात कार्यरत असून हे करताना त्यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध साहत्यिक, सांस्कृतिक आणि वाचन संस्कृती वृध्दींगत करणाऱ्या कार्यक्रमांसाठी पाठबळ दिले आहे. विविध साहित्य संमेलनांच्या नियोजनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्यापासून ते गेली १२ वर्षे कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या अक्षरगप्पांच्या प्रारंभापर्यंतच्या उपक्रमांमध्ये जोशी यांचा नेहमी सक्रीय सहभाग राहिला आहे. विविध सामाजिक,साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थाचे अक्षर दालन हे हक्काचे ठिकाण असून त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याआधी डाॅ. सुनीलकुमार लवटे, अरविंद इनामदार आणि माजी खसदार प्रदीप रावत यांच्या हस्ते अनुक्रमे अनंतराव आजगावकर, किरण ठाकुर, प्रा. नवनाथ शिंदे  यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी अगत्याने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

February 2, 2023 0
1 4 5 6
error: Content is protected !!