
कोल्हापूर : कोल्हापूरच्या उद्योगाला व्यवसायाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगाला स्थान मिळवून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे (जीआयबीएफ) कोल्हापूर मध्ये व्यासपीठ उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमाला इथोपिया आणि इआय सालवेडोर देशाचे कौन्सिल जनरल उपस्थित असणार आहेत. या परिषदेसाठी कोल्हापूरमधील उद्योग संस्था गोशिमा आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेत आहेत.हि आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद दुपारी २ ते ५ या वेळेत हॉटेल सयाजी येथे संपन्न होणार आहे. ‘जीआयबीएफ‘मध्ये अनेक देशांचे दूतावास, उद्योग मंत्रालय आणि विविध देशांतील उद्योजक जोडले गेले आहेत आहेत. उद्योगांच्या जागतिक विस्तारासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे. कोल्हापूरच्या उद्योजकांनी जागतिक बाजारपेठेत आपला उद्योग नेण्यास व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फोरमच्या वतीने येत्या १० ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना हॉटेल सयाजी येथे सन्मानित करण्यात येणार आहे .अशी माहिती ‘जीआयबीएफ‘चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी वर्ल्ड ट्रेंड सेंटरचे कॉर्डीनेटर निखिल ओसवाल, ‘जीआयबीएफ‘चे आंतरराष्ट्रीय समन्वयक दीपाली गडकरी, गोशिमाचे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल,कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री शेटे,मँन्युफँक्चर असोसिएशन अध्यक्ष शीतल केतकळे, युवा समन्वयक अभिषेक जोशी आदी उपस्थित होते. जितेंद्र जोशी म्हणाले, “भारत हा वेगाने विकसित होणारा आणि जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असलेला देश आहे. भारत सरकारने सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया‘, ‘स्किल्स डेव्हलपमेंट‘ यांसारख्या अभियानामुळे भारतासह विदेशी कंपन्यांना व्यवसायाच्या मोठ्या संधी उपल्बध झाल्या आहेत. अशावेळी जागतिक स्तरावर उद्योजकांना एक सामायिक व्यासपीठ असावे,या कल्पनेतून ‘जीआयबीएफ‘ची स्थापना केली. या व्यासपीठाच्या माध्यमातून ऑटोमोबाइल, अभियांत्रिकी, केमिकल,फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड उद्योग, सेवा क्षेत्र अशा विविध व्यावसायिकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. याला कोणत्याही धर्माचे, जातीचे किंवा प्रदेशाचे बंधन नाही. व्यवसाय करणारा कोणीही या फोरमचा सभासद होऊ शकेल. आज‘जीआयबीएफ‘चे ३७ देशांमध्ये सुरु असून,जवळपास ५३ हजार सभासद आहेत.जागतिक मुख्यालय दुबई येथे, मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे, तर कॉर्पोरेट कार्यालय पुण्यात आहे. एमडीएच मसाला कंपनीचे चेअरमन , दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, गायक बप्पी लहरी,संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्यासह इटली, मलेशिया, हंगेरी,बांगलादेश, ऑस्ट्रेलिया,अफगाणिस्तान,स्वीडन, नेदरलँड,इराक, इराण ,साउथ अमेरिकन देश, इथिओपिया,आदी देशांचे दूतावास या फोरमचे मानद सभासद झाले आहेत.”जागतिक स्तरावरील उद्योजकांशी व्यावसायिक भागीदारी करण्याची संधी जीआयबीएफमुळे उपलब्ध होणार आहे. जागतिक स्तरावर उद्योगाला प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जीआयबीएफ पुरस्कार‘देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यातील पश्चिम विभागाच्या पुरस्कारांसाठी निवड समितीने २५ उद्योजकांनी निवड केली आहे. शनिवार, दि. १० मे २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता हॉटेल सयाजी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.इथिओपिया, आणि इआय सेल्वेडोरचे कौन्सिल ऑफ जनरल या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी ‘ट्रेड बियॉन्ड वेस्ट‘ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यावेळी उद्योजकांच्या यशोगाथा ऐकण्याची संधी मिळणार आहे,” असेही डॉ. जितेंद्र जोशी यांनी नमूद केले आहे.
Leave a Reply