मुंबई : संपूर्ण राज्यात गेली काही दिवसापांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने, मुबंईला पुन्हा पावसाने झोडपलं असल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पाऊसामुळे रेल्व काही तासांसाठी ठप्प झाली होती. ती पुन्हा एकदा सुरु झाली आहे. काल दुपारनंतर ठाणे ते कल्याण ते कसारा ते कर्जत अशी रेल्वे वाहतूक काही काही वेळाने सोडल्या जात होत्या. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता रेल्वे ट्रॅकवरील पाणी असल्याने, मध्य रेल्वेची वाहतूक अप आणि डाऊन लाईनवरील लोकल सेवा सुरु झाली आहे. गाड्या ३० मिनिटे उशीरानी धावत आहेत. दरम्यान सतत पडत असलेल्या पावसामुळे शनिवारी दुपारी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. ठाणे ते मुलूंड रेल्वे रुळांवरुन प्रवाशांना चालत असताना चांगलीच दमछाक करावे लागत आहे, पावसामुळे मुलूंड, सायन, कुर्लादरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने या ठिकाणांहून रेल्वे चालवणे धोक्याचे होऊ शकते, यामुळे खबरदारी म्हणून काही काळ या रुळांवर लोकल सेवा बंद करण्यात आली होती. तर ठाणे ते कसारा आणि ठाणे ते कर्जत अशी लोकल सेवा मध्य रेल्वेने सुरु ठेवल्याने प्रवाशांना काही अशी दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने काही तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहेय. त्यामुळे नागरिकांनी त्यांना आवश्यकच असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सुचना शासनाने दिल्या आहेत.
Several parts of Mumbai received heavy rains waterlogging on road and the tracks between Sion and Matunga stations. Express photo by Prashant Nadkar, 05 August 2016, Mumbai
Leave a Reply