हातकणंगले तालुक्यातही पूरसदृश स्थितीत,अनेक गावांना सतर्कतेचा इशारा 

 

घुणकी :  कोल्हापुरात काही दिवसांपासून वरुणराजाने जोरदार हजेरी लावत अनेक तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण केली आहे.  त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व  गावाना  सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक गावातीळ प्रशासकीय अधिकार्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हातकणंगले तालुक्यात देखील, निलेवाडी,पारगाव ,घुणकी, गावातील लोकांना दक्ष राहण्याच्या शासकीय अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने देखील यावेळी चांगलीच कंबर कसली आहे. यावेळी हातकणंगले विधानसभेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हातकणंगले गावातील पुराची पहाणी करून शासकीय यंत्रणेला दक्ष राहण्याची सूचना दिली.  यावेळी काही घराची पडझड झाली होती, संबंधित अधिकारी याना सुचन देऊन ताबडतोब पंचनामा करणेस सांगितले यावेळी , संतोष संकपाळ, उदय शिंदे,अनिल लोहार, महेश कुंभार,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सद्स्य, घुणकीचे आरोग्य सेवक डॉ अनिल शिंदे, आरोग्यसेविका सौ सविता काटकर, व अशा स्वयंसेवीका उपस्थितीत होत्या. जालीदर जाधव, बाजीराव पाटील,संतोष भोसले, संजय गुरव, माजी उपसरपंच मारुती पाटील,सचिन नाईक,रमेश पाटील, इतर उपस्थित नागरीक होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!