
कोल्हापूर : ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात “मैत्री दिन” म्हणून साजरा करणेत येतो, भारतातही युवा वर्गाकडून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून, अखंड मित्रत्वाचे ऋणानुबंध अधिक घट्ट करते. या मैत्री दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी युवा सेना कोल्हापूर शहर आणि नो मर्सी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने *“मैत्री युवा महोत्सव” चे “मुस्कान लॉन, मार्केट यार्ड, कोल्हापूर”* येथे आयोजन करण्यात आले . या मैत्री युवा महोत्सवाचे हे सलग दहावे वर्ष आहे. या मैत्री युवा महोत्सावाच्या माध्यामातून युवा वर्गाने निर्व्यसनी होण्याचा संकल्प करून, निर्व्यसनी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प उपस्थित युवा वर्गाच्या वतीने करण्यात आला.
या महोत्सवाचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, नो मर्सी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ऋतुराज राजेश क्षीरसागर आणि कु. पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि शिवसेना, युवा सेना, नो मर्सी ग्रुपचे पदाधिकारी* यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी युवापिढिला व्यसनमुक्ति व देशभक्ति ची शपथ देताना देशातिल स्त्री-भ्रुण हत्या सारख्या अनिष्ठ प्रथांचा समुळ नायनाट करण्याबाबत आवाहन केले.
यासह गेली १० वर्ष हा उपक्रम सलगपणे होत असल्याने युवासेना व नो मर्सी ग्रुपच्या पदाधिका-यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे संयोजन नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष अक्षय पाटील, रोहन घोरपडे, उपाध्यक्ष अजिंक्य पाटील आणि हर्षवर्धन पाटील आदींनी केले.
Leave a Reply