
घुणकी : कोल्हापुर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे हातकणंगले तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे २००५ सालची परिस्थिती निर्माण होते कि काय असे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे .त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक गावातीळ प्रशासकीय अधिकार्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हातकणंगले तालुक्यात घुणकी गावात देखील रात्री एकूण सात दलित वस्तीतील कुटुंबाना प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. यासर्व परिस्थितीवर प्रांताधिकारी समीर शिंगटे हातकणंगले तालुक्याचे तहसीलदार सुधाकर भोसले, गावातील ग्रामसेवक अशोक भोसले , तलाठी प्रशांत काळे, आरोग्य केंद्राची सर्व टीम, लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजाक्का रासकर, उपसरपंच प्रह्लाद पाटील व सर्व सदस्य , ग्रामपंचायत मार्फत गावातील लोकांना दक्ष राहण्याच्या शासकीय अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने देखील यावेळी चांगलीच कंबर कसली आहे.

Leave a Reply