कोल्हापुर जिल्ह्यात महापूर, पाऊसाचे थैमान सुरूच

 

कोल्हापूर(सचिन कांबळे) : कोल्हापूर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पाऊसाने शहरात पुराची परस्थिती खूपच बिकट होत आहे. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रासह  गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. तर राधानगरी करवीर आदी तालुक्यात गेल्या चोवीस तासात एकूण १ हजार १७३ व सरासरी  ९७.७८ मिमी इतका उचांकी पाऊस झाला आहे. सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्हयातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक मार्गावरील वाहतूक बंद आहे. महापुराची पाणी शहरातील काही घरात शिरल्याने त्यांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. अनेक भागात विजपुरवठा व पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पुणे राष्ट्रीय -महामार्गही बंद ठेवण्यात आला. 

सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर मा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचेदेखील लक्ष आहे. त्यांनी देखील गरज पडल्यास एअर लिपटींग करण्यात येईल असे यवतमाळ येथे बोलताना म्हणाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची पाहणी व प्रसंगी रेस्क्यू करण्यासाठी आपले नौदलाचे जवान गोव्यातून कोल्हापूर दिशेला रवाना झाले आहेत. प्रशासनांकडून सतत आवाहन करण्यात येत आहे. कि शहरातील नागरिकांनी गरज पडल्यासच घरातून बाहेर पडा. स्पीड न्यूजच्या माध्यमातूनही शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की, कोल्हापुरात नागरिकांनी गरज पडल्यासच बाहेर पडावे, अन्यथा सुरक्षित स्थळी थांबावे, माहिती घेऊनच प्रवास करावा, तसेच कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरले नाही तर पूर्णपणे जनजीवन विस्कळीत निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!