
कोल्हापूर: गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पाऊसाने महाभयंकर संकट निर्माण केला आहे. त्याकरीत आज दिनांक ८ रोजी (गुरूवारी) पुरग्रस्तांच्या भेटीसाठी आणि त्यांना लागेल त्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात पोहोचले आहेत. यावेळी मुख्यमंत्री यांनी हवाई पाहणी करून काही पुरग्रस्तांची भेटी घेऊन त्यांना धीर देण्याचे काम केले आणि या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकाना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. ते पुढे म्हणाले कि, योग्यवेळी आपण राष्ट्रीय आपत्ती जाहीर करू असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीची हवाई पाहणी केल आणि पाहणी केल्यानंतर कोल्हापूर,सातारा यापेक्षाही गंभीर स्थिती सांगली जिल्ह्यातील पुराची झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले. या परिस्थितीतवर केंद्र सरकारचेही लक्ष ठेवून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एकंदरीत ही पूरपरिस्थिती पाहत कर्नाटक सरकारनेही अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,खासदार संभाजी राजे छत्रपती, महेश जाधव,राहुल चिकोडे,आमदार राजेश क्षीरसागर,,धैर्यशील माने,समरजीत सिंह घाटगे,उपस्थित होते.
Leave a Reply