
कोल्हापूर : जिल्ह्यातील जलप्रलय परिस्थिती आणि कोल्हापूरच्या खेड्या गावातही जी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.त्या पूर परिस्थितीशी दोन हात करणेसाठी प.पू. श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली एक वैद्यकीय पथक आरोग्य सेवा/वैद्यकीय सेवा पुरविणेसाठी एक वैद्यकीय पथक रवाना केले आहे.अन्न,वस्त्र आणि निवारा ह्या प्राथमिक गरजांबरोबर वैद्यकीय सेवाही खूपच महत्वाची आहे.पुराच्या दूषित पाण्यातून मानवी आरोग्यास काही प्रमाणात हानी पोहचू शकते.हि चिंतेची बाब लक्षात घेऊन स्वामीजींनी एक वैद्यकीय पथक पूरग्रस्त ठिकाणी रवाना करण्यात आले.आज पूराच्या पाण्यातून पूरग्रस्त लोक असो किंवा त्या गावातील लोक असो त्यांना सर्दी,ताप, खोकला आणि उलटी त्याचबरोबर जुलाब,दूषित पाण्याने पायाला खाज वगैरे होणे अश्या प्रकारचे काही आजार निर्माण होऊ शकतात. तेंव्हा अश्या काही लोकांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून ठीक ठिकाणी सेवा केंद्र म्हणून वैद्यकीय पथक कार्यरत आहे.आणि मदत पुरवली जात आहे.शिरोळ मधील गुरुदत्त शुगर कारखानामध्ये आज पूरग्रस्त लोकांना वैद्यकीय सेवा पुरविणेत आली आहे.जवळपास 317 पेशंटची तपासणी करून आरोग्य सेवा पूरविणेत आली आहे. आणि रेंदाळ ह्या गावामध्ये 56 रुग्ण तपासणी आणि वैद्यकीय सेवा पुरविणेत आली आहे.सिद्धगिरी आरोग्यधाम मार्फत आरोग्य सेवा हि जोपर्यन्त पूर्णपणे परिस्थिती आटोक्यात येणार नाही तोपर्यंत मोफत आरोग्यसेवा पुरविणेचे आवाहन प.पू. श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी वैद्यकीय पथकाला दिले आहे. तेंव्हा पूरग्रस्त लोकांनी पूर्णपणे मोफत असणाऱ्या ह्या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे. नुकतेच सुळकूड ता. कागल येथील सौ. प्रणिता प्रकाश ढोणे या पूरग्रस्त गरोदर महिलेला प्रसूती वेदनेने ग्रासले होते, अन चारी बाजूला पाणीच पाणी, अशावेळी कुटुंबातील सदस्यांना ही काय करावे काही सुचेना. ही माहिती मिळताच गेली अनेक दिवस पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सिद्धगिरी टीमचे सदस्य सिद्धगिरी हॉस्पिटलची रुग्णवाहिका घेऊन तिथे पोहचले. अगदी पाच फूट पाण्यातून वाट काढत सौ. ढोणे यांना पाण्याबाहेर आणले व सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून सुखरूप हाॅस्पिटल मध्ये पोहचवले . सिद्धगिरी मठाच्या सर्व तरुणांचे या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.सिद्धगिरी हॉस्पिटल मार्फत डॉ प्रवीण नाईक वैद्यकीय अधिक्षक यांनीही ह्यात खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे.सिद्धगिरी आरोग्यधाम मार्फत जी मोफत आरोग्यसेवा पुरविणेत आली आहे.त्यामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये हॉस्पिटलचे डॉ.प्रमोद घाटगे.ब्रदर राजू शिंदे,सदाशिव,महादेव मकाले.व वाहन चालक श्री काडाप्पा आण्णा,दत्ता,रुषीकेश, प्रसाद नेर्वेकर आणि हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी देवेंद्र हे या पथकामध्ये वैद्यकीय सेवा पुरविणेस सज्ज आहेत.अधिक माहिती किंव्हा संपर्क करणेसाठी श्री.प्रवीण सुतार जनसंपर्क अधिकारी ह्यांच्याशी संपर्क साधा.9325365456.
Leave a Reply