
शिर्डी : राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला पावसाने चांगलेच संकटात उभा केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. हजारो लोक बेघर झाले असून अनेक गावेही उध्दवस्त झालेली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजुन या पूरग्रस्तांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने घेतला आहे. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रियेस अधिन राहुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थीती बघून वैद्यकीय पथक व औषधे ही पाठविणार असल्याची माहिती साई संस्थांनचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी ट्वीट करून दिली.
Leave a Reply