
कागल: कागल तालुक्यातील वंदूर या पूरग्रस्त गावाला चक्क ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊभारून आमदार हसन मुश्रीफ धान्य घेऊन पोहोचले . दूधगंगा नदी पात्राबाहेर आलेल्या चार फुटावर अधिक खोल पाण्यातून त्यांनी हे धाडस केले . पूरग्रस्तांसह वंदूरच्या ग्रामस्थांनी त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले . कागल तालुक्यातील चिकोत्रासह वेदगंगा आणि दूधगंगा या तिन्ही नद्यांना महापूर आला आल्यामुळे सर्वच वाहतूक ठप्प झाली आहे . तसेच कोल्हापूर – बेळगाव राष्ट्रीय महामार्गही बंद आहे . दरम्यान , कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील बिद्रीच्या दूधगंगा पुलावरील पाणी उतरताच आमदार मुश्रीफ यांनी कागल वरून बिद्री मार्गे निढोरी गाठले. निढोरीवरून पिंपळगाव बुद्रुक मार्गे बानगे व त्यानंतर केनवडे फाट्यावरून गोरंबेवरून अानुर. त्यानंतर अानुर वरून गोरंबे मार्गे हादनाळवरून म्हाकवे . त्यानंतर आप्पाचीवाडी , मत्तिवडेवरून करनूर व वंदूर व नंतर हंचनाळ मार्गे सुळकुड या गावांचा दौरा केला .या सर्व गावातील ग्रामसेवक , कोतवाल व तलाठी यांच्यासह मंडल अधिकाऱ्यांना आमदार श्री मुश्रीफ यांनी घरांच्या व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करून तहसीलदार कार्यालयात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या . वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांमध्ये तातडीने वीजपुरवठा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या . ज्यांचे ज्यांचे नुकसान झालेले आहे परंतु त्यांचे बँक खाते नाही अशा तांत्रिक कारणास्तव कोणतीही मदत रोखता येणार नाही . त्यासाठी रोखीने मदत देण्यास प्रशासनाला भाग पाडू ,असे आमदार मुश्रीफ म्हणाले.
Leave a Reply