

रेनो ट्रायबरची नोंदणी 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. https://triber.renault.co.in या वेबसाईटवरून किंवा रेनोच्या अधिकृत विक्रेत्याकडे रु 11,000 टोकन रक्कम भरून ग्राहकांना रेनो ट्रायबरची नोंदणी करता येणार आहे.
“रेनो ग्रुपकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. भारतात विस्तार करण्याच्या उद्देशाने आमचे उद्दिष्ट्य आणि धोरण अगदी स्पष्ट आहे, येत्या तीन वर्षांमध्ये वार्षिक विक्री दुप्पट म्हणजे 200,000 युनिटइतकी वाढवण्यावर आमचा भर राहील. रेनो ट्रायबर आमच्या विस्तार योजनेवर महत्त्वाची भूमिका बजावेल. जागा आणि मॉड्यूलरिटीच्या बाबतीत नवीन मापदंड प्रस्थापित करेल. या विभागात ग्राहक संख्या वाढविण्याच्या दिशेने ट्रायबरचे लक्ष्य असून बी-सेगमेंट अग्रभागी राहील.
रेनो ट्रायबर रेनोचे समकालीन डिझाईन, आधुनिक वैशिष्ट्ये, आधी नव्हती अशी प्रशस्त जागा, मोकळा वावर सोबतच अष्टपैलूत्व उपलब्ध करून देते. बुकिंगला आज सुरुवात झाली असून रेनोच्या कुटुंबात आणखी ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत,” असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामील्लपले म्हणाले. रेनो ट्रायबरचे डिझाईन आकर्षक, दणकट, आटोपशीर (कॉम्पॅक्ट), प्रशस्त आणि संक्षिप्त (मॉड्यूलर) आहे.
Leave a Reply