सारस्वत बँकेतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत

 
पुणे : सहकार क्षेत्रातील अग्रणी सारस्वत बँकेतर्फे कोल्हापूर-सांगलीसह राज्याच्या इतर भागातील पुरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयाचा मदतनिधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’स देण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक कोटींचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला. बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, ज्येष्ठ संचालक किशोर रांगणेकर, संचालक हेमंत राठी, कार्यकारी संचालिका श्रीमती स्मिता संधाने व मुख्य महाव्यवस्थापक अजयकुमार जैन यावेळी उपस्थित होते.
 
काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारा आणि कोल्हापूरसह कोकण, उत्तर महाराष्ट्रातील भागांना महापुराचा मोठा  फटका बसला आहे. यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले, तर अनेकांचे संस्कार उघडयावर आले आहेत. पुर ओसरल्यानंतर या भागांचे पुनर्वसन करण्यासाठी व जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासन आणि अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. सारस्वत बँक महाराष्ट्राची हक्काची बँक असून, बँकेने यापूर्वीही आपत्तीजनक परिस्थितीमध्ये योगदान दिले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना बँकेत नोकरी देऊन त्यांना आधार देण्यात आला होता. समाजचे ऋण फेडण्याची सामाजिक बांधिलकीची भावना सारस्वत बँकेने कायम जपली असून, पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा बँकेने पाऊल उचलले आहे, अशी भावना संचालक मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!